शिवसेनेची निवडणूक तयारी, नवे कार्यकर्ते पक्षात
सातारा; (फलटण)
फलटण-कोरेगाव मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आणि संघटना बांधणीसाठी बैठक फलटण येथे झाली. जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा समन्वयक विराज खराडे आणि उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसह शाखा बांधणी, बूथप्रमुख आणि शिवदूत नेमणुकीवर चर्चा झाली. शिवसेनेचा धनुष्यबाण मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरले. चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दीपक शिंदे, अमित गायकवाड आणि अमित जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, तालुका संघटक, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शासकीय समिती सदस्य आणि शिवसैनिक उपस्थित होते.













