मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरकणात धनंजय मुंढेंना सहआरोपी करण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरकणात धनंजय मुंढेंना सहआरोपी करण्याची मागणी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील सर्व धर्मीय सर्वपक्षीय नागरिक यांनी चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्दयी आणि क्रुर हत्येचा खटला अति अति जलद न्यायालयात चालवून त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी तसेच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हे ज्या धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, धनंजय मुंडे यांनी काल केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तपास अधिकाऱ्यांवर तपास सुरू असताना पुरेपूर दबाव टाकून सर्व काही मनासारखे करून घेतले आणि मग राजीनामा दिला. या प्रकरणाचा तपास हा पुन्हा योग्य दिशेने केला जावा तपास कालावधीत तपास अधिकाऱ्यांना कोणी कोणी फोन केलेत त्याचा सीडीआर रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्याची नावे जाहीर करावी आणि त्यांचे वर कारवाई करावी मग तो कितीही मोठा राजकारणी नेता मंत्री संत्री पक्ष अध्यक्ष असो की कुणीही तरी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा जनक्षोभ होऊन जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ, सरपंच संघटनेचे किसनराव जोर्वेकर, शिवसेनेचे दिलीप पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सोमवंशी, विठ्ठल राजपूत, आबासाहेब सैंदाणे, उदय पवार, घृष्णेश्वर पाटील, प्रदीप देशमुख, नितीन देशमुख, राकेश राखुंडे, प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे, किशोर देशमुख, प्रदीप देशमुख, अनिल जाधव, छोटू पाटील, सुदर्शन देशमुख, अनिल चव्हाण, सागर निकम, उदय देशमुख, रवींद्र पाटील, भगवान पाटील, शैलेंद्रसिंग पाटील, दिवाकर महाले, अविनाश काकडे, मुकेश नेतकर, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें