साताऱ्यात जीबीएस चा धोका वाढला! प्रशासन अलर्ट मोडवर कधी येणार?

साताऱ्यात जीबीएस चा धोका वाढला! प्रशासन अलर्ट मोडवर कधी येणार?

सातारा प्रतिनिधी; गेल्या काही दिवसांपासून गुईलेन-बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस)या दुर्मिळ आजाराने पुण्याला वेढा घातला आहे. दुर्मिळ असतानाही या आजाराचा पुण्यात उद्रेक झाला आहे. अक्षरशः 47 जण आय सी यु मध्ये आहेत रुग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. आत्तापर्यंत जवळपास चार जणांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे. हा आजार दिसताना साधा वाटत असला तरीही जीवघेणा ठरू शकतो.

गुईलेन-बॅरे सिंड्रोम एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.

हा एक स्वयंप्रतिकारक रोग आहे. यामध्ये शरीराच्या दोन्ही बाजूला विकार होतो. सुरुवातीला हातामध्ये व नंतर पायामध्ये स्नायू कमकुवत होतात अशक्तपणा येत असूनअर्धांगवायू,श्वसनासाठी समस्या, असे अनेक विकार या आजारामुळे होतात.

साताऱ्यापासून काहीच अंतरावर पुणे आहे.

या दुर्मिळ आजाराचे संशयित रुग्ण साताऱ्यात आढळून आले होते. 

रुग्ण संख्या कमी असल्याने परिस्थिती हाताळता येत आहे. 

कृष्णा हॉस्पिटल ने एक पाऊल पुढे टाकीत संशयित रुग्णांचे उपचार केले आहेत. सोबतच या आजाराच्या विरोधात लढण्यासाठी पुढाकार दर्शवला आहे.

पण दुर्दैवाने पुण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास साताऱ्यात पुण्यासारखी सुसज्ज रुग्णालये नाहीत. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा आजार दूषित पाणी आणि दूषित अन्न यामधून होतो. यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दूषित पाणी आहे का? याबाबत पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत. ज्या भागांमध्ये दूषित अन्न व पाणी असण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. 

पुण्यातून येजा करणाऱ्या प्रवासी यामधील संशयित रुग्णांचा शोध घेणे. 

दूषित पाणी आणि दूषित अन्न

या संदर्भाने जनजागृती पर मोहीम राबवणे गरजेचे आहे. 

संशयित रुग्णाच्या उपचारासाठी विभागानुसार सुसज्ज केंद्रांची निर्मिती करणे. अत्यंत गरजेचे आहे. सोबतच सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे हा जिल्हा राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. याचा विचार करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर येणे खूप गरजेचे आहे. परिस्थिती हाताळण्यास ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याबाबत मंत्र्यांशी संपर्क साधून त्यावर काम करणे गरजेचे आहे. हा आजार ज्या विषाणू अथवा जिवाणूमुळे होतो. असे जिवाणू अथवा विषाणू 

साताऱ्यातील कोणकोणत्या परिसरात आढळून येत आहेत. 

या आजाराचा कमीत कमी प्रादुर्भाव होण्यासाठी कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील याबाबतची माहिती चारही मंत्र्यांना पुरवणे गरजेचे आहे. साताऱ्यात उद्रेक झाल्यास विरोधकांना आयतेच कोलीत मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने घ्यावे. कोरोनातही सुरुवातीला अशीच सूट देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. 

हा आजार हवेतून पसरत नसला तरीही जीवघेणा ठरू शकतो. बाधित व्यक्तीकडून परिसरात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें