फार्मर आयडी करीता घेतलेले पैसे परत मिळावेत – फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

फार्मर आयडी करीता घेतलेले पैसे परत मिळावेत – फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल करणार

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी फार्मर आयडी करीता शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत. फार्मर आयडी काढणे मोफत असताना शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे तात्काळ परत करावेत व या प्रकरणाची चौकशी करावी बेकायदेशीर केंद्र चालकांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केली आहे.

शेती क्षेत्राला प्रगत आणि शाश्वत बनविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी शेतक-यांनी तयार करून घावेत सदर फार्मर आयडी शेतक-यांनी ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या माध्यमातून मोफत नोंदणी करावी असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर करूनही ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडुन 100 ते 300 रुपयांची आकारणी प्रति फार्मर आयडी तयार करण्यास घेतले गेले असून ही मागणी अशीच सुरू असून मोफत योजनेतूनही शेतकऱ्यांची कोट्यवधीची आर्थिक लूट फलटण तालुक्यात होऊ लागली आहे.

फलटण तालुक्यात जवळपास 2 लाख 47 हजाराहून अधिक शेतकरी आहेत. या आर्थिक लुटीला वेळीच आळा नाही बसला तर कोट्यवधीची लूट फलटण तालुक्यात होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्यांनी ज्यांनी या फलटण प्रकरणी आर्थिक लुट केली आहे त्यांच्याकडून सबंधित शेतकऱ्यांचे घेतलेले पैसे परत करावेत व संबंधित केंद्र चालकांचे परवाने रद्द करावेत. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवून ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

फलटण तालुक्यात जवळपास 2 लाख 47 हजाराहून अधिक शेतकरी आहेत. आज अखेर 10 हजार 906 फार्मर आयडी काढण्यात आले आहेत. आज अखेर या मागे लाखो रुपयांची आर्थिक लूट करण्यात आली आहे. या आर्थिक लुटीला वेळीच आळा बसला नाही तर कोट्यवधीची लूट फलटण तालुक्यात होईल. त्यामुळे तात्काळ कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट –

१) फार्मर आयडी प्रकरणी सीएससी सेवा केंद्र, महाऑनलाईन (सेतू) केंद्र यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट चालवली असून या केंद्रांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या वरती तात्काळ कारवाई करावी. लवकरचस्वाभिमानी शेतकरी संघटना याविषयी आंदोलन करणार आहे – धनंजय महामुलकर, जिल्हा अध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

२) फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी नोंदणी आर्थिक लूट प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करणार – नितीन यादव,फलटण तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें