फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वैभवात आता आणखी एका ऐतिहासिक सुवर्णपानाची भर

फलटण, दि. १३ फेब्रुवारी : फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वैभवात आता आणखी एका ऐतिहासिक सुवर्णपानाची भर पडत आहे. ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ या बहुप्रतिक्षित न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात येत्या रविवारी होत असून, यामुळे फलटणच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण–कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे न्यायालय फलटणसाठी मंजूर झाले होते. आता त्याचे प्रत्यक्ष उद्घाटन होत असल्याने स्थानिक वकिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा

रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विमानतळाशेजारील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती नितीन आर. बोरकर यांच्या शुभहस्ते न्यायालयाचे उद्घाटन होईल. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे, राजेश एस. पाटील, संजय ए. देशमुख आणि रणजितसिंह राजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

नागरिक आणि वकिलांची मोठी सोय

आजवर वरिष्ठ स्तरावरील दिवाणी दाव्यांसाठी फलटण व परिसरातील पक्षकारांना सातारा येथे जावे लागत होते. यामुळे वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होत होता. आता हे न्यायालय स्थानिक पातळीवर सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक बार असोसिएशननेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नुकतेच फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले असून, त्यापुर्वी मंजुर झालेले वरिष्ठ स्तर न्यायालयाची आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. त्यामुळे ‘फलटण जिल्हा’ निर्मितीच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर फलटणच्या वाढत्या महत्वाची ही ठळक नोंद ठरत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal