लोकशाही दिनात तीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

लोकशाही दिनात तीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

चाळीसगाव प्रतिनिधी :- 

येथे सन 2023 मध्ये झालेल्या चाळीसगाव येथील नगर परिषदेच्या मालकीच्या गणेश कॉम्प्लेक्स मधील गाळे लिलावा प्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला या कामी गणेश सुभाष अग्रवाल यांनी सर्वप्रथम तालुका लोकशाही दिन तदनंतर जिल्हा लोकशाही दिन आणि नंतर विभागीय लोकशाही दिन या ठिकाणी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय लोकशाही दिनाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सदरील गाळे लिलाव प्रक्रियेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. तरी सदरील विभागीय चौकशीही निष्पाप पणे करण्यात यावी ही विनंती गणेश अग्रवाल यांनी केली आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात नव्याने तीन अर्ज दाखल झाले होते, त्या तिन्ही अर्जावरील सुनावणी पूर्ण करण्यात आली. गाळे लिलाव प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात एकूण १२ तक्रारी प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी तीन अजौवर सविस्तर सुनावणी घेण्यात आली. अग्रवाल यांनी दाखल केलेल्या गाळे लिलाव प्रकरणात शिल्लक गाळ्यांचा नव्याने लिलाव काढणे, तक्रारदारांना प्रक्रियेत सहभागी करून घेणे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें