वाघळी येथे स्मार्ट मीटरविरोधात भर पाऊसात रास्ता आंदोलन.

वाघळी येथे स्मार्ट मीटरविरोधात भर पाऊसात रास्ता आंदोलन.

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे बसविण्यात आलेले स्मार्ट वीज मीटर तातडीने हटवून पूर्वीप्रमाणे पोस्टपेड वीज मीटर बसविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, वाघळी येथील सोसायटीसमोरील महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते, यावेळी महावितरणचे कर्मचारी आंदोलनात ठिकाणी उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येत असून, त्यामुळे सर्वसामान्य वीजग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आंदोलनावेळी केला.

मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात वाघळी येथे असलेले सब डिव्हिजन या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. वाघळी महामार्गावर काही वेळ रस्त्यावर बसून आंदोलन छेडले होते. पोलिसांच्या मध्यस्थी जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांनी केले मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी केला होता परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने आणि वीज वितरण कंपनी वरिष्ठ कर्मचारी रस्त्याच्या बाजूला बसून आंदोलकांचे म्हणणे ऐकून ग्रामस्थांचे समाधान करून वीज वितरण कंपनीने निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूर्यवंशी, सरपंच, तसेच सोनू धनगर उपसरपंच नाना आहिरे, ग्रामपंचायत सदस्य निलेश जंगले, निंबा महाजन, सुरेंद्र चौधरी, विकास चौधरी, दिलावर शेख, तंटामुक्ती अध्यक्ष भाईदास नाना खैरे, सोसायटी सदस्य सुभाष खैरे, कैलास पाटील, दादाभाऊ महाजन, अण्णा चौधरी, नाना अहिरे, विजय खैरे, वाल्मीक जाने, राज बोरसे, वना वाणी, आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें