रेशन धान्य घेताना विक्रेत्याची अरेरावी? लाभार्थ्यांची चाळीसगाव तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार; कारवाईची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी :-
शहरातील नेताजी चौक परिसरातील रेशन धान्य विक्रेते शाम काशिनाथ सिरसागर यांच्याविरोधात सुमारे ५० ते ६० रेशन कार्डधारकांनी तक्रार केली आहे. संबंधित विक्रेत्याकडून लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा तसेच रेशन धान्य वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत लाभार्थ्यांनी सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी चाळीसगाव तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की रेशन धान्य विक्रेते शाम काशिनाथ क्षीरसागर यांच्याकडून रेशन घेताना रेशन धान्य लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते लाभार्थी रेशन घेण्यासाठी रेशन दुकानात गेल्यानंतर संबंधित रेशन दुकानदार लाभार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवाद साधत नाही तसेच महिलांनाही अपमानास्पद वागणूक दिली जाते तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रेशन दुकानातून लाभार्थी धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर विक्रेत्याकडून उद्धटपणे बोलले जाते. रेशन कार्डधारकांशी सौजन्याने वागण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याने लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच रेशनचे धान्य वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. रेशन धान्य हा गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे रेशन दुकानात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याशी सन्मानाने वागणे, त्यांना नियमानुसार आणि वेळेत धान्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची संबंधित पुरवठा विभागाने दखल घेऊन चौकशी करावी, रेशन कार्डधारकांना योग्य वागणूक मिळते की नाही याची खातरजमा करावी आणि तक्रारीत तथ्य आढळल्यास नियमानुसार सदर रेशन दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनावर मनोज शिवाजी गवळी, संजय बबन राखुंडे, रामदास संजय राखुंडे, विक्रम युवराज राखुंडे, गणेश जगन्नाथ वाणी, अनिल विलास साबळे, राहुल शाम राखुंडे, बेबीबाई कसबे, दादाभाऊ खडाजंगे, नारळ भावडू गवळी, शिवाजी लक्ष्मण गवळी, किसनराव गंगाराम जाधव, यशवंत महादू गवळी, लताबाई बबन गवळी, अशोक वाल्मिक गवळी, पोराजी ईश्वर गवळी, कलाबाई लाला गवळी, जनाबाई गवळी, चंद्रकांत पितांबर मोरे, भिकन नारायण जगताप, प्रकाश शिंदे घुले, आशाबाई शिवाजी वाघ, ऋषिकेश राजू चव्हाण, मंगल सिंग गनसिंग राजपूत, भास्कर भिका वाघ, सचिन शंकर नागणे, श्रावण चंदन राखुंडे, नरेश विष्णू लोंढे यांच्यासह अनेक रेशन लाभार्थ्यांच्या सह्या आहे.












