माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया! नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी!
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेच्या मदतीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमकपणे मैदानात उतरली आहे!
समितीचे जनरल सेक्रेटरी नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत दुष्काळग्रस्तांच्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पाणीटंचाई, अन्नधान्याचा तुटवडा, जनावरांचा चारा आणि गोरगरीब जनतेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, समितीने सादर केलेला दुष्काळ निवारणाचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणीही करण्यात आली.
घोषणांपेक्षा ठोस उपाययोजना महत्त्वाच्या! दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, हीच समितीची भूमिका!
माणुसकीचे नाते जपूया, संकटग्रस्तांना मदतीचा हात देऊया!
नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे, AVB MAZA NEWS.












