विजेचा शॉक लागुन ४ जणांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालका विरुध्द गुन्हा दाखल

विजेचा शॉक लागुन ४ जणांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालका विरुध्द गुन्हा दाखल

 फलटण प्रतिनिधी

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०८/०७/२०२६ रोजी मौजे खामगाव ता. फलटण जि. सातारा येथे सकाळी ०५.३० वा. सुमारास घराच्या पुढील लोखंडी तारेचा शॉक लागुन एकाच कुटुंबातील १) सतीश ऊर्फ पिसुरडया किसन शिंदे वय ४५ वर्ष, २) गंगु सतीश शिंदे वय ४० वर्ष, ३) सचिन सतीश शिंदे वय २६ वर्ष, ४) आरती सतीश शिंदे वय २४ वर्ष सर्व रा. खामगाव ता. फलटण हे ०४ जण मयत झाले होते. त्याबाबत शितल सचिन शिंदे यांनी दिले तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते.

 

सदर अकस्मात मयताचा पुढील तपास सुरु केला असता सदर तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांच्या घराचे वरुन निष्काळजीपने केबल टाकलेल्या होत्या व त्या केबलवायरला सपोर्ट लावलेली लोखंडी तार हि फिर्यादी यांच्या घरासमोर पडुन त्या तारेला हात लागल्याने वरील चौघांचा जागीच मृत्यु झाला होता. त्यावरुन संबधीत केबल चालक निष्पन्न करुन केबल चालक नामे तात्यासो चंदर लांडगे रा. खामगाव साखरवाडी ता. फलटण याच्या विरोधात फिर्यादी यांनी दिले जबाबावरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गु.र.क्र. ४०२/२०२६ बीएनएस कलम १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये आणखी कोणाचा निष्काळजीपणा आहे काय याबाबत अधिकचा तपास करत आहोत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शिवानी नागवडे या करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें