⭕ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या कार्यकाळात भोंगळ प्रताप ( भाग १)

⭕ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या कार्यकाळात भोंगळ प्रताप ( भाग १)
⭕उच्च न्यायालयाने प्रकरण निकाली काढूनही नियमबाह्य सेवा समाप्तीचे आदेश?
⭕ चौकशी करून कारवाई करण्याची सैनिक समाज पार्टीची मागणी
गडचिरोली(क्राईम ब्यूरो प्रतिनिधी) गडचिरोली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून बडतर्फ करण्याची कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे केली आहे.
प्राप्त झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील माता- बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध नाही. यासारख्या बाबींचा समावेश आहे.जिल्हा परिषद गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भाकरोंडी या दुर्गम, डोंगराळ परिसरात डॉ. संयुक्ता निमजे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये आहरण व संवितरण प्रभार देण्यात आला होता. डॉ. संयुक्ता निमजे यांच्या कार्यकाळात माता मृत्यू व मलेरिया आजाराने मृत्यू झाल्याचे दिसत नाही. त्यांच्या योग्य उपचार व नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे अर्भक बाल व उपजत मृत्युचे प्रमाण कमी झाले आहे. इतकेच नव्हे तर डॉ. निमजे यांचे काम उत्कृष्ट असल्यामुळे तीन वेळा पुनऀनियुक्ती देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र भाकरोंडी यांच्याकडे प्रलंबित असलेले सर्व लाभ मंजूर झाल्याने याचिकाकर्त्यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेली याचिका क्रमांक ५८७७/२५ मागे घेण्यात आली होती. सदर याचिका न्यायालयाने दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी निकाली काढली. तरीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या भोंगळ प्रतापामुळे डॉ. संयुक्ता निमजे यांना २४ सप्टेंबर २०२६ रोजी, तब्बल चोविसाव्या दिवशी सेवा समाप्तीचे आदेश दिले. न्यायालयाने प्रकरण निकाली काढूनही चोविसाव्या दिवशी पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्याकडे न्यायालयाने दिलेले निकालीपत्र पोहोचले नाही का❓ कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता थेट सेवा समाप्तीचे आदेश देणे हा हेतूपुरस्सर अन्यायच नाही का❓ तब्बल चोविसाव्या दिवशी पर्यंत उच्च न्यायालयाने निकाली काढलेली याचिका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांना वाचता आली नाही का❓कंत्राटी पध्दतीने आरोग्य सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचा उददे्श म्हणणे चुकीचे ठरणार नाही. निकाली काढलेल्या याचिकेवर विचार न करता हेतुपुरस्सर सेवा समाप्तीचे आदेश देऊन सेवामुक्त करणे हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली नाही का❓असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा अनेक भोंगळ प्रतापाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून अन्याय ग्रस्तांना न्याय द्यावा. सैनिक समाज पार्टीच्या वतीने वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात या सारख्या अनेक भोंगळ प्रतापांचा स्पष्ट उल्लेख केला आहे.


 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें