सोनगावात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा! मोठी भट्टी उद्ध्वस्त; १०० लिटर कच्चे रसायन व दारूसाठा जप्त

सोनगावात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा!

मोठी भट्टी उद्ध्वस्त; १०० लिटर कच्चे रसायन व दारूसाठा जप्त

सोनगाव | बारामती प्रतिनिधी  संतोष जाधव

बारामती तालुका पोलिसांनी सोनगाव येथील पारधी वस्ती परिसरात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून मोठी हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत अंदाजे १०० लिटर कच्चे रसायन (वॉश) व दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. अवैध हातभट्टी दारूविक्री व निर्मितीविरोधात अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केली. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें