अग्निशमन व उद्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमिततेची चौकशी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची चाळीसगाव नगरपरिषदेकडे मागणी; दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी

अग्निशमन व उद्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमिततेची चौकशी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची चाळीसगाव नगरपरिषदेकडे मागणी; दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव : चाळीसगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील तसेच सुवर्णताई उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अनियमितता होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व संबंधित नगरसेवकांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना यापूर्वी संबंधित कंत्राटदारामार्फत दरमहा १६ हजार ४५० रुपये वेतन दिले जात होते. मात्र, त्यानंतर सूर्यवंशी नामक कंत्राटदाराकडे कामाचा ठेका गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना दरमहा २३०० रुपये कमी वेतन दिले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी कपात करण्यात आली, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कंत्राटदाराने नियमांचे पालन केले आहे की नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. या प्रकरणात अनियमितता आढळल्यास संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा. तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार योग्य वेतन मिळेल याची खात्री करावी. याशिवाय, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला आदेश द्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष कैलास पाटील, माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, पत्रकार रणधीर जाधव, सदस्य महेश पाटील, सोमनाथ मोहिते आदी मराठा बांधवांच्या सह्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें