महिला पोलीस समिती, सदस्यपदी सुनीता राजेंद्र महाडिक यांची निवड

महिला पोलीस समिती, सदस्यपदी सुनीता राजेंद्र महाडिक यांची निवड

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :- 

समाजरत्न पुरस्काराने सन्मानित समाजसेविका, Live नवं विचार Newsच्या मुख्य संपादक, विविध पत्रकार संघटना व सामाजिक संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या सुनीता राजेंद्र महाडिक यांची महाराष्ट्र पोलीस महिला समिती, चाळीसगाव पोलीस स्टेशन सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारिता, समाजसेवा आणि जनसंपर्क क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही निवड चाळीसगाव पोलीस उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ आणि उपपोलीस निरीक्षक संदीप घुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. समाजाशी सातत्याने जोडले जाऊन लोकहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना महिला समितीच्या माध्यमातून जबाबदारी देण्याचा उद्देश असून, महिला समितीसाठी सदस्यांची निवड करताना समाजात सातत्याने कार्य करणाऱ्या, लोकांमध्ये विश्वासार्ह प्रतिमा असलेल्या आणि सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येते त्या अनुषंगाने सुनीता महाडिक यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी अशा व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरते, महाराष्ट्र पोलीस महिला समितीवरील त्यांची निवड ही त्यांच्या कार्याचा सन्मान मानली जात आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून त्या महिला सुरक्षा, कायदेविषयक जनजागृती, सामाजिक समन्वय आणि पोलीस-जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रभावी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें