घरातून निघून गेलेल्या वेदांत अनिल साळुंखे या मुलाला शोधण्यास अखेर पोलिसांना यश

घरातून निघून गेलेल्या वेदांत अनिल साळुंखे या मुलाला शोधण्यास अखेर पोलिसांना यश

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) : –

घरातून निघून गेलेल्या वेदांत अनिल साळुंखे या मुलाचा चाळीसगाव शहर पोलिसांनी

यशस्वी रित्या शोध घेऊन त्याला त्याच्या परिवाराच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईत तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी तांत्रिक तपास, समन्वय आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली. दि. १ जुलै २०२६ रोजी हा मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद (मिसिंग क्र. ६८/२०२६) चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, सीडीआर, एलबीएस, सी-ट्रेस, सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रवासाच्या माहितीच्या आधारे या मुलाचा चाळीसगाव, नाशिक, नागपूर, बडोदा, सुरत असा प्रवास झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच विविध जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून सुरत परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर वेदांत साळुंखे याचा सुरत येथे सुखरूप शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले, आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक भरत नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर व चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसात या मुलाचा शोध लावल्याबद्दल पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें