भावनांचा महापूर( वारी)
वारीची ओढ लागावी कोरड्या डोळ्यांना…
आणि त्या डोळ्यांत दाटून यावं सावळं विठ्ठलरूप…
माऊलींच्या वात्सल्यमयी स्पर्शाने डोळ्यांना फुटावा प्रेमपान्हा…
नामघोषाच्या गजरात भावनांची व्हावी ढगफुटी…
डोळ्यांच्या तीरावरून खळखळून वाहावी इंद्रायणी,
आणि लोकांनी त्याला म्हणावं “महापूर”…
जसं लेकरू आईच्या कुशीत धावत येतं,
तसंच लाखो वारकरी आळंदीच्या माऊलीकडे धाव घेतात
भक्ती, प्रेम आणि आनंदाचा अमृतपान्हा मागण्यासाठी…
आणि मग इंद्रायणीलाही फुटतो लेकरांच्या ओढीचा पान्हा…
लोक पुन्हा म्हणतात—”हा महापूर नाही, ही माऊलीच्या प्रेमाची अखंड गंगा आहे!” 🙏🚩
Author: AVB Majha
Post Views: 124













