वट पौर्णिमेनिमित्त महिलांनी केली वडाच्या वृक्षाची पूजा
कोरपना, दि. २९ : तालुक्यातील पारडी गावातील महिलां वट पौर्णिमा (वट सावित्री) उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली.
सकाळपासूनच विविध ठिकाणी महिलांची वडाच्या वृक्षाजवळ गर्दी पाहायला मिळाली. पूजा साहित्य, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करून महिलांनी व्रताचे पालन केले. यावेळी सावित्री-सत्यवानाच्या कथेला धार्मिक परंपरेनुसार विशेष महत्त्व देण्यात आले. महिलांनी कुटुंबाच्या सुख-समृद्धीबरोबरच समाजात शांतता, समृद्धी आणि सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठीही प्रार्थना केली.
- महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा होणारा वट पौर्णिमा सण हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. वडाच्या वृक्षाला दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जात असल्याने या दिवशी त्याची पूजा करण्याची परंपरा आहे.
Author: AVB Majha
Post Views: 107













