साक्री तालुक्यातील धाडणे येथे एकूण 261 लाभार्थ्यांपैकी 235 लाभार्थ्यांना पोलिओचा डोस देऊन 90% उद्दिष्ट पूर्ण झाले.
प्रतिनिधी : विलासराव पाटील, साक्री
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला साक्री तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धाडणे गावासह वाडी-वस्त्यांवर तसेच गावाबाहेरील शेतांमध्ये वास्तव्यास असलेल्या लाभार्थी बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी विशेष फिरते मोबाईल पथक नियुक्त करण्यात आले असून ठिकठिकाणी पोलिओ बुथचे देखील नियोजन करण्यात आले आहे. धाडणे येथील पोलिओ
बुथचे उद्घाटन धाडणे ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती उषाबाई सोनवणे. यांच्या हाताने करून बुथ सुरू करण्यात आला.
धाडणे येथे बुथ क्रमांक 1 वर सौ.सुषमा अहिरराव व श्रीमती रत्नाबाई अहिरराव यांनी एकूण 116 लाभार्थ्यांपैकी 111 बालकांना पोलिओचा डोस दिला. बुथ क्रमांक 2 वर सौ. सुषमा अहिरराव व सौ. कविता जाधव या दोघींनी मिळून 65 पैकी 50 लाभार्थ्यांना पोलिओचा डोस दिला.
क्रमांक दोन चे काम एक दिवस आधीच म्हणजे शनिवारी आटोपण्यात आले. बुथ क्रमांक 3 वर श्रीमती सुनिता अहिरराव व श्रीमती साधना पाटील यांनी 80 लाभार्थ्यांपैकी एकूण 74 लाभार्थ्यांना पोलिओचा डोस दिला. उर्वरित 26 लाभार्थ्यांना येत्या तीन दिवसात घरोघरी जाऊन प्रत्यक्षात पोलिओचा डोस पाजण्यात येईल. अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी श्री. डॉ. जे एस गाढे यांनी दिली.
“पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक बाळापर्यंत पल्स पोलिओ लसीकरण पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन कासारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉ, गायत्री अहिरे, डॉ, अक्षय देवकते कासारे , यांनी केले.
धाडणे उपकेंद्र अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ. जे एस गाढे.आरोग्य सेविका श्रीमती, जया के अहिरे, आरोग्य सेवक श्री आकाश राऊत, आशा कार्यकर्ते श्रीमती सुनिता अहिरराव. सौ. सुषमा अहिरराव. तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती रत्नाबाई अहिरराव, श्रीमती साधना पाटील, सौ. कविता जाधव. यांनी
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
संपूर्ण साक्री तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचावा यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य विभागाने सर्व पालकांना आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पल्स पोलिओचा डोस आवर्जून पाजण्याचे आवाहन केले आहे.
पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सध्या तालुक्यात फिरते आरोग्य मोबाईल पथकसुद्धा कार्यरत आहे. प्रत्येक बालकापर्यंत पल्स पोलिओचा डोस पोहोचविण्यासाठी या पथकामार्फत दुर्गम भागात प्रत्यक्ष भेटी देऊन प्रत्येक पात्र बालकाला पोलिओचा डोस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाकडून व विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. काल या पथकाने शेणपुर येथे वाडी वस्त्यांवर जाऊन सगळ्या बालकांना पोलिओचे डोस दिले.













