नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नाशिक प्रतिनिधी:
सावरकर स्मारकात सकाळपासून पूजन, पुष्पहार अर्पण, भक्तीगीते आणि आकर्षक रांगोळीने वातावरण देशभक्तीमय झाले होते.
यावेळी नाशिक जिल्हाधिकारी आयुष शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार सरोज आहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांनी एक महत्त्वाची मागणी करत “२८ मे हा दिवस देशभक्ती दिन – एक दिन देश के लिए म्हणून केंद्र सरकारने घोषित करावा” अशी मागणी केली.
या मागणीसाठी नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या असून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे निवेदन पाठविण्याची तयारी सुरू आहे.
संपूर्ण भगूर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
देशभक्तीच्या घोषणांनी भगूर नगरी दणाणून गेली.
🎥 प्रतिनिधी – सचिन देवरे, नाशिक












