बीट स्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवळी आश्रमशाळेचे यश

बीट स्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवळी आश्रमशाळेचे यश

चाळीसगाव प्रतिनिधी :- 

शासकीय आश्रम शाळा सर्वे येथे आयोजित बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवळी येथील आदिवासी प्राथमिक, व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी कृषी, अन्न, स्वच्छता व आरोग्य यासंदर्भातील उपकरण शाळेतील विद्यार्थी मोनाली पावरा जतीन पावरा व यश पावरा यांनी मांडले. या उपकरणास त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला व त्यांची प्रकल्प स्तरावर निवड करण्यात आली. विज्ञान प्रदर्शनात मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, सचिव आदित्य सूर्यवंशी, संचालिका जयश्री सूर्यवंशी, सहाय्यक प्रकल्प पवनकुमार पाटील व संदीप पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एल. एम. पाटील, प्राचार्य सतीश पाटील, मुख्याध्यापक तुषार खैरनार तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक रमाकांत कापडणीस ज्ञानेश्वर पाटील, पंकज पाटील, संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें