चाळीसगाव शहर पोलिसांनी राबवले कॉम्बिंग ऑपरेशन, मोहिमेत गुन्हेगार आणि संशयितांवर केली मोठी कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी :-
चाळीसगाव शहर पोलिसांनी चाळीसगाव शहरात आज मध्यरात्री विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले या मोहिमेत गुन्हेगार आणि संशयितांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील ८० आरोपी व गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली यात ४४ गुन्हेगागारांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. २४ जूनच्या रात्रीचाळीसगाव शहर पोलिसांनी ही मोहिम राबविण्यात आली, या मोहिमेत पोलिसांनी अनेक ठिकाणी घरझडती घेत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. कारवाईदरम्यान दोन जणांविरुद्ध आर्म ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये एकूण ३९ लाख रुपये किमतीची तीन आलिशान वाहने जप्त करण्यात आले . यामध्ये एमएच-२० ईजे-४८९० क्रमांकाची व्हॅगनार, एमएच-१४ ईपी-७३५८ क्रमांकाची ऑडी आणि एमएच-४३ एआर-३४०९ क्रमांकाची वरना कार यांचा समावेश आहे. या मोहिमेत आठ पकड वॉरंटची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. याशिवाय दारूबंदी कायद्यांतर्गत तीन गुन्हे नोंदवून कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तीन इसमांना समन्सही बजावण्यात आले. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात पण अशा प्रकारे कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेची पथके तसेच ३ आरसीपी पथकांचा सहभाग होता.












