युवा प्रवचनकार गजेंद्र महाराज मुसळे यांना वारकरी भूषण पुरस्कार प्रदान
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
आळंदी चोपदार चरिटेबल फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा वारकरी भूषण पुरस्कार युवा प्रवचनकार ह भ प ऍडव्होकेट गजेंद्र महाराज मुसळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला वारकरी संप्रदायाच्या सेवा कीर्तन प्रवराच्यातून केलेल्या सामाजिक प्रबोधन आणि तरुण पिढीला अध्यात्माकाकडे जोडण्याचे कार्य याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे .चांदोबाचं लिंब येथे झालेल्या गौरव सोहळ्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदार ह. भ .प .बाळासाहेब महाराज रणदिवे तसेच ह.भ.प .सोपानकाका महाराज टेंभुर्कर यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमास महानुभाव आश्रम तरडगाव येथील प्रमोद रायरेकर ह भ प जालिंदर महाराज ह भ प विश्वास कोळेकर महाराज ह भ प सुरेश महाराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते












