मोर्वे येथे मिलिंददादा पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
खंडाळा तालुक्यातील तीर्थक्षेत्र मोर्वे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मकरंद आबा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंद दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रविवार दिनांक 21 जून रोजी तीर्थक्षेत्र मोर्वे येथील ठोंबरे पडळकर वस्ती रस्ता, तालीम , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोरील रस्ता,स्मशान भूमी रोड, जय हनुमान क्रीडा संकुल तार कंपाऊंड अशा विविध कामाचे उद्घाटन श्री.मिलिंदादा पाटील यांच्या हस्ते आणि पंचायत समिती उपसभापती श्री.संतोष वीर, भादे जिल्हा परिषद गटाचे नेते श्री.संभाजी साळुंखे,राष्ट्रवादी पक्षाचे खंडाळा तालुका युवक अध्यक्ष श्री अजय भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा मोर्वे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी मा.सरपंच अंकुश पडळकर,पोलिस पाटील राहुल धायगुडे,गुरुकृपा पतसंस्था चेअरमन मल्हारी आण्णा जगताप, ज्ञानेश्वर धायगुडे,अशोक धायगुडे,विक्रम धायगुडे,प्रशांत काशवेद,सोमनाथ सूर्यवंशी,गोविंद धायगुडे, ग्राममंडळ व्हा.चेअरमन शुभम जाधव,सदस्य शुभम जगताप,प्रवीण धायगुडे,ओमकार सूर्यवंशी, कॉन्ट्रॅक्टर मयूर आमते, विश्वास सूर्यवंशी आणि मोर्वे ग्रामस्थ उपस्थित होते.












