अश्विनी चे काय चुकले? आणि नेहा ने काय गुन्हा केला.      ⭕ पैशासमोर पोलीसांच्या नागी पडल्या ढिल्या…?? न्याययदेवता तरी न्याय देणार का❓❓     ⭕पत्रकार महादू पवार याचे मत जाणून घ्या

अश्विनी चे काय चुकले? आणि नेहा ने काय गुन्हा केला.     

⭕ पैशासमोर पोलीसांच्या नागी पडल्या ढिल्या…?? न्याययदेवता तरी न्याय देणार का❓❓    

⭕पत्रकार महादू पवार याचे मत जाणून घ्या

 

मुंबई ( चक्रधर मेश्राम) दि. 31 जुलै 2025:- अलीकडेच पुण्यामध्ये हगवणे कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आणि प्रकरण राजकीय स्तरावर वर्धास्थ म्हणून दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु मीडियाने हे प्रकरण उघडकीस आणले. याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये म्हाडामध्ये काम करणाऱ्या उपनिबंधक अधिकाऱ्याच्या पत्नीनेही पती आणि सासरच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली आणि पुन्हा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या 25 वर्षात महादु पवार यांना पत्रकार क्षेत्रातील दिर्घ अनुभव नवी मुंबईमध्ये अनुभवयास मिळाला. अश्विनी ही मुलगी बौद्ध आणि तिचा पती मराठा समाजाचा.. एका कंपनीमध्ये त्यांची ओळख झाली आणि त्यांचे लग्न जुळले. मराठा समाजामध्ये बौद्ध समाजाबाबतीत किती गृहता आहे ही बाब पुढे निदर्शनास आली. घरच्यांचा लग्नासाठी आग्रह आणि आलेली एक श्रीमंत कुटुंबातील मागणी यापुढे अश्विनी शरणागत झाली . तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र मराठा मानसिकता असणाऱ्या कामठे परिवाराने तिला स्वीकारले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना एक वेगळे घर देण्यात आले आणि पुढे त्यांचा संसार सुरू झाला. त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव नेहा असे आजी आजोबांना नाही पणजोबा महिलेने ठरवले. परंतु नात झाली आहे, ती एका बौद्ध समाजाच्या पोटातून जन्माला आली, त्यामुळे ती नकोशी झाली. भावनेपोटी अश्विनीला मुलगी झाल्याने तिचे तोंडही सासरच्या मंडळींनी पाहिले नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्याने आयुष्यभर साथ देण्याचे लग्न करताना शपथ घेतली होती ,तोच तिचा पती योगेश याने पळ काढून ह्या दोघी मायलेकींना घराबाहेर काढले. अश्विनी ही धाडसी आणि लढाऊ असल्याने तिने या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. दिवसभर पोलीस ठाण्यामध्ये माय लेकी रडत काढत दिवस ढकलत काढला, परंतु वाशी पोलीस ठाण्यात त्यांना काय न्याय मिळाला नाही? न्यायाच्या प्रतीक्षेत अश्विनी ही वाशी पोलीस ठाण्याच्या फेऱ्यामध्ये राहिली, वाशी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली, परंतु पोलिसांनी तिच्या सासरच्या पैशाच्या दबावामुळे कोणतीच कारवाई केली नसल्याचे हे पीडित अश्विनीचे नातेवाईक सांगतात. ती खंबीरपणे लढत राहिली. योग्य वेळी वेळप्रसंगी तिने ऍट्रॉसिटी केसही दाखल केली. आता हे प्रकरण बेलापूर कोर्टामध्ये प्रलंबित आहे ,त्यामुळे अधिक भाष्य करता येणार नाही, गेली सात वर्ष अश्विनी ही आपल्या आयुष्याचा लढा लढते आहे आणि मुलीच्या भवितव्यासाठी ती कष्टही उचलत आहे, त्यासाठी तिला प्रचंड अपमान असाहाय्य दुःख सहन करावे लागत आहे. अलीकडेच बेलापूर कोर्टातून तिला पोटगी मिळावी आणि नेहाचा शैक्षणिक खर्च उचलावा ,असा आदेश न्यायालयाने देवूनही अद्यापही वाशी पोलीस ठाण्यातून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप अश्विनीच्या नातेवाईकांनी केला आहे. केवळ पैशाच्या बळावरच हा सर्व डावपेच सासरच्या मंडळी कडून सुरू आहे. ह्या बाबतीत अश्विनी प्रचंड नाराज झालेली आहे, बेचैन आहे, न्याय देवता तिला न्याय देईल का? हे अपेक्षीत. आजही ती न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहे, परंतु तिला कोणताच न्याय मिळाला नाही. फसवणारा पती भेटेल या अपेक्षाने ती कधीच नव्हती, परंतु आता आपली फसवणूक झालेली आहे, असे तिचे ठाम मत झाल्याने कधी कधी ती स्वतःला संपवून घेण्याचा विचार करते ,परंतु नेहाच्या भवितव्याचे पुढे काय? आई म्हणून या विचाराने ती व्यथित होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व दुःख विसरून ती पुन्हा लढायला सुरुवात करते. तिचा हा संघर्ष ऐकून मन ही हेलावून गेले. अश्विनीला वाशी पोलीस ठाण्यातून न्याय मिळेल का? न्यायदेवता तिच्या बाजूने निर्णय देऊन भारताचे भवितव्य म्हणून ज्या नेहाकडे पाहिले जात आहे. तिच्या भवितव्यासाठी न्यायालय योग्य निर्णय घेईल का? ह्या विचारात ती नेहमी पडते आहे. ती नेहमीच नशिबाला दोष देत आहे, स्वतः प्रत्येक परिस्थितीचं नशीब आजमावित आहे. एका बाजूला शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला देशासाठी काहीतरी करण्याची देश भावना अशा ह्या मायलेकींचा संघर्ष अधिक हे दुःखद आहे. या प्रसंगातून तिला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे ,असे पत्रकार म्हणून महादु पवार सर्व महाराष्ट्रातील जनतेला पोलिसांना आणि न्यायदेवतेला साखडे घालतो. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक अश्विनी वैतागून कंटाळून त्यांनी जीवन संपवले, परंतु अश्विनीकडे पाहून असे प्रसंग येण्यामुळे नक्कीच त्याचा आदर्श घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. अश्विनीचा हा लढा लढण्यासाठी एक पत्रकार म्हणून वाशी पोलीस ठाण्यात पाठपुरावा करणार आहे, वेळप्रसंगी बेलापूर कोर्टात जाऊन मी न्यायाधीशांची ही भेट घेऊन या बाबतीत आपण तातडीने निर्णय घेऊन पैसे, सत्ता आणि बळ हे नामोहरण करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील जनतेने अश्विनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षा महादु पवार यांनी व्यक्त केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें