फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार गुन्हेगारांनी हददीत प्रवेश केल्याने गुन्हा
फलटण प्रतिनिधी:
दि. ३०/०७/२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी जिल्हयात कोंबीग ऑपरेशन राबविण्याबाबत आदेश देण्यात आले होत त्या अनंशंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कोंबीग दरम्याण पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार पाहीजे फरारी आरोपी तडीपार माहीतगार गुन्हेगार तपासण्याचे काम करण्यासाठी पोलीस ठाण्यातील एकुन तिन टिम तयार करण्यात आल्या होत्या त्यातील एक टिम पहाटे ०२.०० वा. दरम्याण सरडे मध्ये तडीपार इसम चेक करण्यासाठी गेले असता त्यांना त्या गावातील तडीपार केलेले १) रोहीत भिमराव जाधव वय ३२ वर्षे २) ऋतीक दत्तात्रय जाधव वय २३ वर्षे ३) विशाल बाळासो जाधव वय २३ वर्षे ४) सुरज शिवाजी बोडरे वय २७ वर्षे रा. सरडे ता. फलटण जि.सातारा. यांना पोलीस पार्टीची चाहुल लागल्याने ते पळुन जावू लागले असता पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. सदर इसमाना माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये दोन वर्षाकरीता सातारा व पुणे जिल्हयातुन तडीपार करण्यात आले होते. तरीही ते हददपार आदेशाचा भंग करून अनाधिकृतपणे वास्तव्य करीत असताना मिळुन आल्याने त्याचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे –
सर्व करावाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. तुषार दोशी सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर पोलीस अधीक्षक, मा. राहूल धस सो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसारसुनिल महाडीक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे जी.बी. बदने, पो.उपनि, पो.हवा. नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पो.कॉ. हनुमंत दडस, मपोकों अरुंधती कर्णे यांनी या कारवाईमध्ये
भाग घेतला होता. पुढील तपास पो.हवा. जगदाळे करीत आहेत.













