एव्हीबी माझा | विशेष वृत्त फलटण आगारातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; कर्मचाऱ्यांकडून चौकशी व कारवाईची मागणी

एव्हीबी माझा | विशेष वृत्त

फलटण आगारातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; कर्मचाऱ्यांकडून चौकशी व कारवाईची मागणी

फलटण प्रतिनिधी : फलटण एसटी आगारातील अधिकारी सुखदेव अहिवळे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर आरोप पुढे येत आहेत. महिला वाहकांशी कथित गैरवर्तन, अरवाच्य शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, दमदाटी तसेच कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचे आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

 

याच दरम्यान कर्मचारी गणेश सोनवलकर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाप्रकरणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची (NCR) नोंद झाल्याने हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.

 

कर्मचारी वर्गातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीही विविध तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, या तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, तक्रार करणाऱ्यांना विविध प्रकारच्या कारवाईची भीती दाखवली जाते.

 

महिला वाहकांशी अपमानास्पद वर्तन होत असल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोपही केला जात आहे.

 

फलटण आगारात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची बदली अथवा निलंबन होणार का, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा नियंत्रक गायकवाड यांनी प्राप्त सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

 

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित अधिकारी सुखदेव अहिवळे यांची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर वृत्त अद्ययावत करण्यात येईल.

 

– विजय भिसे

संपादक, एव्हीबी माझा

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें