तरडगावात ऑर्केस्ट्रा दरम्यान घडलं मारहाण प्रकरण

तरडगावात ऑर्केस्ट्रा दरम्यान घडलं मारहाण प्रकरण

कारवाई साठी बौद्ध समाजाने पोलिस स्टेशन समोर

घालविली अख्खी रात्र अन दिवस

सातारा प्रतिनिधी आबासाहेब धायगुडे 

 

लोणंद:नुकतीच तरडगाव ता.फलटण येथील श्री.भैरवनाथ यात्रा संपन्न झाली.यात्रेनिमित्त दिनांक ३० एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस 

ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.याच दरम्यान बौद्ध समाजातील कुटुंबा सोबत मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने बौद्ध समाजाने थेट पोलिस स्टेशन गाठत कारवाई करण्याची मागणी केली.यासाठी बौद्ध समाज हा अख्खी रात्र आणि दिवस लोणंद पोलिस स्टेशन समोर ठाण मांडून होते.विशेष म्हणजे यावेळी पुरूषां बरोबर महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.कारवाई झालीच पाहिजे.ही एकच मागणी सर्वांकडून करण्यात येत होती.अखेर संबधितांना,१५ जणांना अटक करीत कारवाई करण्यात आल्याने बौद्ध समाजाने समाधान व्यक्त करीत पोलिस स्टेशन सोडले.दिनांक १ मे च्या रात्री डीवायएसपीनीं या घटने प्रकरणी लोणंद पोलिस स्टेशन ला येत संपूर्ण आढावा जाणून घेतला.घटनेतील पीडितां कडून माहिती जाणून घेतली.तसेच ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत.त्यांना ही समोर घेत त्यांचाही खुलासा जाणून घेतला.तत्पूर्वी अनेकांचे जबाब घेत संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली आहे.या घटने प्रकरणी बौद्ध समाजातील महिलेकडून कडून जबाब देण्यात आलेला असून या जबाबा नुसार लोणंद पोलिस स्टेशन कडून कार्यवाही करण्यात आलेली आहे.करूना गायकवाड यांनी लोणंद पोलीस ठाणेस हजर राहुन खबरी जबाब दिलेला असून या घटने प्रकरणी त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली.करुना गायकवाड यांचा मुलगा ऑर्केस्ट्रा वेळी उठुन नाचु लागला म्हणुन ऑर्केस्ट्रा बघण्या करिता आलेल्या मराठा समाजातील लोकांनी त्यांच्या मुलाला हाताने मारहाण केली.करुना गायकवाड स्वतः हे भांडण सोडविण्यास गेल्यानंतर त्यांना देखील दोन चापटी मारल्या असल्याचे सांगण्यात आलेले आहे.तसेच बौद्ध समाजातीलच इतर बायका सोडविण्यास आले असता त्यांना देखील मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी केली.म्हणुन त्यांचेविरुद्ध तक्रार आहे.असे जबाबात म्हटले आहे.अनुसूचीत जाती अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून लोणंद पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार