महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित महापर्यटन उत्सव अंतर्गत विविध सहलींचे आयोजन.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित महापर्यटन उत्सव अंतर्गत विविध सहलींचे आयोजन.

राज्यात पहिल्यांदाच होणार “हनी बी पर्यटन”….

महा पर्यटन महोत्सव 2025 मा. ना. श्री. शंभुराज देसाई, मंत्री, पर्यटन, खनिकर्म व माजी सै नि क कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सातारा आणि मा. ना. इंद्रनिल नाईक, राज्यमंत्री, पर्यटन, उच्च व तंत्र शिक्षण,आदिवासी विकास, मृदु व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली होत असुन मा. डॉ. श्री. अतुल पाटणे, प्रधान सचिव पर्यटन विभाग आणि मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी, व्यवस्थापकिय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. महापर्यटन उत्सवात आयोजित विविध टूरमध्ये पर्यटक सहभाग घेऊ शकतील . टूरमध्ये सहभागासाठी प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक राहील व यासाठी वेबसाईटवर संपर्क क्रमांक व नोंदणी शुल्क आणि टूरचा प्रकार सविस्तर नमूद करण्यात आलेला आहे. त्यानुसार खालील प्रमाणे टूर चे आयोजन करण्यात आलेले आहे.

टूर कालावधी दि. 2 मे ते 4 मे 2025 

1.हनी बी टूर:

   मधमाशी पालन उद्योगाची व या उद्योगाची निगडित असणाऱ्या सर्व घटकांची माहिती हनी बी टूरमध्ये देण्यात येईल या टूरचे दोन भाग करण्यात आलेले आहेत.

 1)महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध संचालनालय …

2. मधाचे गाव मांघर:

        वरील ठिकाणी सहलीला जाण्यासाठी गोल्फ क्लब ग्राउंड व एमटीडीसी रिसॉर्ट येथून या सहली मध्ये सहभाग होण्यासाठी नोंदणी करण्यात आलेल्या पर्यटकांना मध संचालनालय महाबळेश्वर येथे एकत्रित करण्यात येईल. कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर पर्यटकांचे स्वागत करण्यात येईल. मद संचालन मे महाबळेश्वर येथे कोणकोणत्या बाबी आपण पाहणार आहोत याविषयी माहिती देण्यात येईल त्यानंतर पर्यटकांना संचालनाला यामध्ये असणाऱ्या विविध विभागांना भेटी देऊन त्याविषयी सविस्तर माहिती सांगण्यात येईल. राज्य शासनाने मध संचालनाची स्थापना करण्यामागील उद्देश सांगण्यात येईल महाबळेश्वर ते सन 1946 पासून आधुनिक पद्धतीनेमधमाशा पालन उद्योग सुरू असून , 1 मे1954 रोजी एपी कल्चर इन्स्टिट्यूट स्थापना झाली या इन्स्टिट्यूट मध्ये राबविण्यात येणारे उपक्रम उदाहरणार्थ प्रशिक्षण संशोधन मध प्रक्रिया मधुबन मधमाशापालन उद्योगासाठी आवश्यक असणारी साहित्य वाटप मंडळामार्फत मधाची खरेदी मधुबन ब्रँड एगमार्क सेंद्रिय मध प्रमाणीकरण याविषयीमाहित देण्यात येईल त्याशिवाय खालील घटकांचा व माहितीचा समावेश आहे .

अ ) हनी पार्क: हनी पार्कमध्ये मधमाशा पालन उद्योगातील माहितीचे बोर्ड लावलेले असून यामध्ये मधमाश्या पालन व्यवसायामध्ये रोजगार निर्मिती कशा प्रकारे केली जाते. मधमाशांचा जीवनक्रम मधमाशांच्या जाती मधमाशांचे प्रकार व त्यांचे कार्य तसेच विविध प्रकारच्या मधपेट्या मधयंत्र या विषयी माहिती देण्यात येईल 

ब ) मधुबन: मधुबन मध्ये सातेरी व मेली फेरा या जातीच्या मधपेट्या वसाहतीसह ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक मतपेटी उघडून त्यातील मधमाश्या राणीमाशी कामकरी माशी नर माशा त्यांची अंडी अळी पी लावा पोळी भरलेला मध हे प्रत्यक्ष दाखवण्यात येईल पर्यटकांना मधपोळे हातात घेऊन त्यांची सेल्फी देखील काढता येईल मधुबनामध्ये मधमाशांना आवश्यक असणारे खाद्य उदाहरणार्थ मकरंद पराग देणाऱ्या वनस्पती उदाहरणार्थ जांभूळ ,गेळा ,हिरडा, पिसा,कारवी ,व्हायटी ,आखरा, इत्यादी वनस्पतींची माहिती देण्यात येईल. 

I love Madhuban या सेल्फी पॉईंटच्या पर्यटक ठिकाणी सेल्फी काढू शकतील.

क) संग्रहालय: विविध शास्त्रज्ञांचे फोटो फुलोऱ्याचे वेळापत्रक, विविध प्रकारची मध यंत्र,मधमाशीचे चित्र व त्यांच्या अवयवांची नावे मधमाशा मध कसा तयार करतात याविषयी माहिती असणारे हे संग्रहालय असून तेथे माहिती देण्यात येईल.

ड) मध प्रक्रिया युनिट: या युनिटमध्ये मध प्रक्रिया संच द्वारे मधावर प्रक्रिया केली जाते वमेण प्रक्रिया करून मेण पत्रा तयार केला जातो.होते हा आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मध प्रक्रिया युनिटमध्ये मधातील पाण्याची प्रमाण कमी करणे व पाश्चरायझेशन बाबत माहिती दिली ,प्रक्रिया का प्रक्रियेमधील स्टेजेस याची माहिती देण्यात येईल.

कच्चा मेणा पासून मेण पत्रा तयार तयार करण्याची प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल तसेच मध बॉटलिंग,पॅकिंग लेबलिंग ,दाखवण्यात येईल.

ड) प्रयोगशाळा या ठिकाणी मधाची शुद्धता तपासणी मधामध्ये कोणते घटक असतात मधाचे मानवी शरीराला उपयोग काय आहे ज्ञानाचे उपयोग याविषयी माहिती देण्यात येईल येथे असणारी उपकरणे पाहता तेथील तसेच विविध प्रकारच्या वनस्पतीच्या मधातील असणाऱ्या पोलंद्वारे कोणत्या वनस्पतीचा मध आहे हे प्रात्यक्षिक तपासून दाखवण्यात येईल.

इ) व्याख्यान सत्र:

सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण हॉल मध्ये बसवण्यात येईल या ठिकाणी मधमाशापालन व्यवसायाद्वारे रोजगार निर्मिती प्रशिक्षणाची सुविधा मार्केटिंग सुविधा याविषयी माहिती देण्यात येईल तसेच मध व्यवसायाच्या पुस्तिका निशुल्क पुरवण्यात येतील. 

ई) मंडळाचा मधुबन मध खरेदी: कार्यालयाच्या आवारातील विक्री केंद्रावर मंडळाचा मधुबन या ब्रँडचा सेंद्रिय मध पर्यटकांना खरेदी करता येईल .

       या टूरमध्ये मध संचालनालय चे संचालक आणि इतर ज्येष्ठ सहाय्यक हे माहिती देण्यासाठी सहभागी होतील.

        पर्यटन विभागामार्फत मध संचालनालयाचे आभार व्यक्त करण्यात येईल व पुढील टूर साठी प्रस्थान करण्यात येईल.

2. मधाचे गाव मांघर:

             मध संचालनालय सरकारी बं. नं.5 महाबळेश्वर येथून पर्यटकांना मधाचे गाव मांघर या ठिकाणी नेण्यात येईल. मांघर हे गाव महाबळेश्वर पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव तापोळा रस्त्यावर आहे .तापोळा मांघर प्रवेश हद्दीत मधाचेगाव मांघर अशी कमान उभारलेली आहे .गावात जाईपर्यंत सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधमाशांना उपयुक्त अशा वनस्पती आढळून येतात त्या वनस्पतीवर नाव देखील दिलेले आहेत तसेच निसर्ग संवर्धन पर्यावरण पर्यटन मधमाशापालन याची माहिती सांगणारे बोर्ड लावलेले आहेत.

अ) वैयक्तिक मधुबन :

जाताना दुतर्फा गावकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक मध पेटींचे मधुबन स्थापन केलेले आहे हे वैयक्तिक मधुबन जाताना पर्यटकांना दाखवण्यात येईल.

ब) नॉर्थकोर्ट पॉईंट: वन विभागाच्या हद्दीत उंचावर नॉर्थ कोर्ट पॉईंट आहे हा पॉईंट पाहता येईल या ठिकाणावरून समोर मकरंद गड एका बाजूला प्रतापगड एका बाजूला महाबळेश्वर मधील गावे पुढे खालील खालच्या बाजूला कोयना नदीचा महाबळेश्वर उगम पावलेला व पुढे तापोळ्याला जाणारा कोयना नदीचा पात्र प्रवाह पाहता येईल उंचावरूनच डोंगरदर्‍यावरील उतारावरील शेतीचे विहंगम दृश्य अतिशय मनोहर आणि सुंदर पर्यटकांना दाखवण्यात येईल. याच ठिकाणावरून सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या , पर्वत रांगा दाखवण्यात येतील व सूर्यास्ताचे दृश्य देखील अतिशय सुंदर या ठिकाणावरून दिसते. 

क) माहिती व प्रशिक्षण दालन: जिल्हा नियोजन समिती सातारा यांच्या निधीतून माहिती व प्रशिक्षण दालन तयार करण्यात आले आहे या ठिकाणी मधमाशा पालन विषयक बाबीवरील माहिती फोटोग्राफ्स लावण्यात आले असून मधमाश्या पालन उद्योगासाठी आवश्यक असणारी उपकरणे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत.

  उपरोक्त सहली दि. 02 ते 04 2025 पर्यंत सुरु राहणार आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें