चाळीसगावची शांताबाई करते फेसबुकवर धूम, शहरांमध्ये एकच चर्चा शांताबाई कोण?
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
चाळीसगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून एकच चर्चा ऐकायला मिळत आहे, ती म्हणजे शांताबाई कोण?, कोण आहे शांताबाई ? कोण चालवतय, कुठून चालवते, शांताबाईचे फेसबुक अकाउंट याची सर्व चाळीसगावकरा मध्ये चर्चा ऐकताना मिळत आहे, याचे कारण असे आहे की शांताबाई नावाचे फेसबुक अकाउंट चाळीसगावात आहे, सदर फेसबुक अकाउंट मध्ये चाळीसगावच्या नामांकित व्यक्तीबद्दल त्यात पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसेच विविध सामाजिक संघटना असे विविध प्रकारच्या नामांकित व्यक्तींबद्दल ही शांताबाई आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून सगळ्यांचे लक्ष केंद्रित करत असते, त्यामुळे चाळीसगाव शहरांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, शांताबाई कोण? बऱ्याच दिवसापासून हे फेसबुक अकाउंट चालू असताना पोलीस खाते देखील हतबल झाल्याचे दिसत आहे, शांताबाई ज्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकते त्याच्या दुसऱ्या दिवसी शांताबाई कोणाबद्दल पोस्ट टाकेल याची उत्सुकता चाळीसगावकरामध्ये असते, शांताबाई टाकत असलेल्या पोस्टमध्ये जनतेला खरी काय ती माहिती मिळत असल्याने शांताबाई बद्दल जनतेमध्ये आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे, दरम्यान शांताबाई टाकत असलेल्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह असे काहीही नसल्याने कोणीही तिच्याबद्दल तक्रार करायला पुढे येत नाही, त्यामुळे काहीही असो कशीही असो शांताबाई कशी का असेना, शहरातील समस्या ही शांताबाई जनते समोर सत्यता मांडत असल्याने चाळीसगाव करांना ही शांताबाई हवीहवीशी वाटत आहे.













