सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा संघाने पटकावला “सर्वोत्कृष्ट जिल्हा” किताब

पुणे: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी राज्यपाल निर्गमित राजभवन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाने राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ “आव्हान 2025 26 ,(चान्सलर ब्रिगेड) आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळाचे” आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय शिबिरामध्ये महाराष्ट्रातून राज्यभरातील विविध विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या पुणे जिल्हा टीमने “सर्वोत्कृष्ट जिल्हा” हा किताब पटकावला.

या टीममध्ये पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून 15 विद्यार्थी व 10 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. या टीमचे नेतृत्व विद्यापीठाच्या रासेयो संचालक डॉ. गणेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग समन्वयक प्रा. अविनाश पाटील (सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स कोंढवा) व डॉ. राणी शितोळे (शाहू महाविद्यालय सहकारनगर) यांनी केले. सदर कार्यशाळेमध्ये प्रथमोपचार, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे अग्निशमन साधनांचा वापर करणे, अत्यवस्थ पेशंटला आवश्यक सी पी आर देणे, बिल्डिंगला आग लागल्यानंतर दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू करणे, वॉटर रेस्क्यू, डेड बॉडी मॅनेजमेंट, तसेच भूकंप, महापूर आहे नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे व आपत्ती ग्रस्त नागरिकांना सुखरूप वाचविणे, याचे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल 5 बॉटलिन पुणे यांनी दिले. सदर प्रशिक्षणामध्ये प्रमुख सारंग कुर्वे यांच्या मार्गदर्शन खाली पथक प्रमुख इन्स्पेक्टर मते साहेब, इस्पेक्टर अरुणकुमार यादव तसेच सदाशिव जयभाई, अविनाश गायकवाड, अंकुश घुले, संतोष वाघ या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे बटालियन या टीमने दिले. यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे क्षेत्रीय संचालक डॉ. अजय शिंदे, विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. गणेश भामे यांच्यासह विद्यापीठ प्रशासनातील सर्व अधिकारीवर्ग, विविध महाविद्यालयातील प्राचार्य तसेच रासेयो पुणे जिल्हा समन्वयक आदींनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal