धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘हायटेक’ सर्व्हेलन्स व्हॅनचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते लोकार्पण!

धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘हायटेक’ सर्व्हेलन्स व्हॅनचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते लोकार्पण!

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.

 

धुळेकरांच्या सुरक्षेसाठी आता पोलिसांची ‘तिसरी नजर’ अधिक तीक्ष्ण आणि हायटेक झाली आहे. धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आज एका अत्याधुनिक ‘सर्व्हेलन्स व्हॅन’चा लोकार्पण सोहळा पार पडला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते या व्हॅनचे विधिवत पूजन करून ती पोलीस ताफ्यात दाखल करण्यात आली.

ही साधीसुधी गाडी नसून एक ‘फिरता कंट्रोल रूम’ आहे. या व्हॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात चारही बाजूंना नजर ठेवू शकणारे हाय-क्वालिटी कॅमेरे, रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाश देणारे फ्लड लाईट्स आणि लाउडस्पीकर सिस्टीम बसवण्यात आली आहे.

शहरातील सण-उत्सव असोत, राजकीय मोर्चे असोत किंवा यात्रा आता प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे ‘लाईव्ह’ लक्ष असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी थेट नियंत्रण मिळवणे यामुळे सोपे होईल. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना उंचावरून परिस्थिती पाहता यावी यासाठी या व्हॅनच्या वरच्या भागात उभे राहण्याचीही खास सोय करण्यात आली आहे.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या व्हॅनमुळे धुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें