कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर शेतकऱ्याच्या मुलाने देश सेवेसाठी इंडियन आर्मीत घेतली उतुंग भरारी, गावकुसा बाहेर पोहोचले यशाचे नवे शिखर
चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
आर्थिक परिस्थिती कशीही असुद्या ध्येय गाठण्यासाठी अंगी तीव्र जिद्द व संकटावर मात करण्याची अभिलाषा असली की अशक्यप्राय वाटणाऱ्या यशास सहज गवसणी घालता येते हे चाळीसगांव तालुक्यातील हातगाव येथील शेती आणि मजुरी करणाऱ्या नंदू गंगाधर आव्हाड यांच्या मुलांने दाखवून दिले आहे. मुलगा देश सेवा करण्यासाठी इंडियन आर्मीच्या सेवेत दाखल झाल्याने हा कुटुंबासह परिसरात अभिमानाचा व कौतुकाचा क्षण ठरला आहे. नंदू आव्हाड याच्या मुलाने अल्पावधीतच कोणत्याही वशिल्याशिवाय केवळ मेहनत आणि अंगी असलेल्या गुणवत्तेच्या जोरावर इंडियन आर्मीमध्ये दाखल होऊन संपूर्ण परिसरासह कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे. ही यशोगाथा हातगाव येथील अमन नंदू आव्हाड याची आहे. अमन हा वयात आल्यापासून विविध नोकरीच्या शोधात होता, या काळात त्याने मैदानी खेळ खेळून सराव सुरू केले, थेट पोलीस आर्मी सारख्या भरतीमध्ये उभा राहत यशाची वाट बघत असतांनाच छत्रपती संभाजी नगर येथे भरती झाला. यावेळी त्याची जिद्द आणि चिकाटी त्याच्या फळास आली. त्याचे वडील नंदू आव्हाड हे शेती करतात तर त्यांच्या पत्नी सौ.मीना नंदू आव्हाड या अंगणवाडी सेविका आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरानं मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे. कोणतीही नोकरीची भरती असेल तेथे तो जात होता. लहानपणापासूनच प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे त्याने धडे घेतले. या यशामध्ये त्याची जिद्द आणि चिकाटी उपयोगी आली. या यशात त्याला त्याचे आई वडिल आणि चुलते यांचे कोलाचे योगदान मिळाले.












