धुळे महापालिकेच्या महापौर पदी मायादेवी परदेशी यांची तर उपमहापौर पदी ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यांची एकमताने निवड.

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.

धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या विशेष सभेत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांची महापौर पदी तर जोशना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौर पदी एकमताने निवड करण्यात आली आहे महापौर पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून देखील उमेदवारी देण्यात आली होती तसेच एमआय ने देखील आपली उमेदवार दिले होते मात्र यावेळी अर्ज माघारीच्या वेळी शिवसेना राष्ट्रवादीसह एमआयएमने आपले उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी हाच उंचावून झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून अपक्ष उमेदवार असलेले रउप पठाण यांनी मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले… भाजपची एक हाती सत्ता महापालिकेत असून तब्बल 50 नगरसेवकांच्या एकमताने मायादेवी परदेशी यांची महापौर पदी तर जोत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे… यावेळी जिल्हाधिकारी तथापिटासीन अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला.. शहरातील नागरी समस्या सोडवण्यासह मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा शहरात अतिशय गंभीर असून तो लवकरात लवकर सोडवला जाईल असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी दिले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal