धाडणे येथील “विवेक मोरे” या युवकाची “अग्निवीर” म्हणून निवड गावात आनंदाचे वातावरण.

धाडणे येथील “विवेक मोरे” या युवकाची “अग्निवीर” म्हणून निवड गावात आनंदाचे वातावरण.

साक्री प्रतिनिधी – विलासराव पाटील.
धाडणे येथील सर्वसामान्य कुटुंबातील युवक विवेक गोविंदा मोरे (वय वर्ष २२) याची मिलिटरी मध्ये अग्नीवर म्हणून निवड झाली.

तो भोई समाजाचा असून दिवसभर त्याच्या आई वडील शेतात मोलमजुरी करतात. संध्याकाळी घरी आल्यावर त्याची आई चणे फुटाणे विकायला जाते आणि वडील भाजीपाला विकायला जातात. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला त्यांच्या मुलाची मिलिटरी मध्ये निवड झाली तेव्हा खूपच आनंद झाला. यापूर्वी दोन्ही मुलांनी प्रयत्न करूनही त्यांची भरती न झाल्यामुळे जे कुटुंब नाराज होते, त्यांचे विवेकच्या यशामुळे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. कारण हा त्याचा शेवटचा चान्स होता. यावेळी त्यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले.

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील ‘विवेक’ हा तीन नंबरचा सुपुत्र यापूर्वी पण त्याचे दोन्ही भावांनी मिल्ट्रीमध्ये भरती व्हावे म्हणून बरेचसे प्रयत्न केले, पण दोघांनाही अपयश आले. विवेक हा सुद्धा वयाच्या अठराव्या वर्षीपासून मिलिटरी मध्ये भरती व्हावे म्हणून सतत प्रयत्न करत होता. परंतु सप्टेंबर 2022 जून 2023 आणि जून 2024 या तीनही वेळेस त्याला अपयश आले. 2022 मध्ये तो ग्राउंड मध्येच फेल गेला. मात्र 2023 मध्ये पॅटर्न बदलला. या वेळेपासून आधी लेखी परीक्षा व्हायला लागली, आणि नंतर ग्राउंड व्हायला लागले. त्यावेळेस तो लेखी परीक्षेत आधी पास झाला. परंतु त्याला हॉल तिकीटच आले नाही. त्यामुळे त्याला ग्राउंड देण्याचा चान्सच मिळाला नाही. त्याने त्यावेळेस वर रिपोर्ट पण केला पण अद्यापपर्यंत त्याला त्याचे उत्तर सुद्धा मिळाले नाही. 2024 ची शोकांतिका त्यापेक्षा वेगळी नाही यावेळेस तो लेखी परीक्षा पास झाला, ग्राउंड पण पास झाला, मेडिकल सुद्धा झाले, पण शेवटच्या यादीत त्याचे नावच आले नाही. तरीही त्यांनी चिकटली सोडली नाही आणि जुलै 2025 मध्ये त्याने परत एकदा नव्या दमाने लेखी परीक्षा, ग्राउंड, आणि मेडिकल, सगळेच दिले . सगळ्या परीक्षा पास पण झाला. हा त्याचा शेवटचा चान्स होता.शेवटी यादीत नाव आले. .त्यावेळेस त्याला आणि त्याच्या परिवाराला आनंदाचा पारावार उरला नाही. यावेळी अति उत्साहाने ग्रामस्थांनी आणि त्याच्या मित्रमंडळींनी ढोल ताशाच्या गजरात मोठी मिरवणूक काढली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें