फलटण महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक, पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार

फलटण:-फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने हातावर पीएसआय गोपाल बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे व प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक अत्याचार केला असल्याचे लिहीत आत्महत्या केली होती.पिडीता राहत असलेल्या घराचा मालक प्रशांत बनकर याला पोलिसांनी पहाटे अटक केली असून या प्रकरणात फरार झालेला पीएसआय गोपाल बदने हा अद्याप फरारच आहे. 

सदर घटनेची माहिती सर्वत्र पसरतात पीएसआय गोपाल बदने याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. प्रशांत बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता पोलिसांनी दोन पथके तयार करून या दोघांची शोधमोहिम सुरु केली होती. पहाटेच्या सुमारास प्रशांत बनकर हा एका फार्महाऊसवर लपला असल्याचे पोलिस पथकास समजले तेथून प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केले. 

महिला डॉक्टरने फलटण मधील नामांकीत हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. तळहातावर गोपाल बदने याचे नाव लिहून त्याने चारवेळा बलात्कार केल्याचेही त्यात लिहिले होते तसेच प्रशांत बनकर याचे नाव लिहून त्यानेही शारिरीक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला होता. या आत्महत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सदरच्या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती. विरोधकांकडून सत्ताधारी यांच्यावर अनेक आरोप होत होते. सदर प्रकरणी पोलीस विभाग , आरोग्य विभाग यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते.

सदर प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने याला अद्याप अटक करण्यास पोलिसांना यश आले नसून तो अद्याप फरार आहे. तीन ते चार पोलिसांची पथके पीएसआय गोपाल बदने याच्या मागावर असून उद्या दिनांक २६ रोजी फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून सदर दौऱ्यापूर्वी पीएसआय गोपाल बदने याला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal