कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय मिळणार आहे ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय मिळणार आहे ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण प्रतिनिधी:- मी या ठिकाणी येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न झाला आमची लहान बहीण जी डॉक्टर होती तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे कोणत्याही परिस्थितीत त्या बहिणीला न्याय मिळणार आहे आरोपींना शिक्षा मिळणार आहे परंतू प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होतोय महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे थोडीशी जरी शंका माझ्या मनात असती तर हा कार्यक्रम मी रद्द केला असता प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता आरोप करणाऱ्याची आहे असे स्पष्ट मत फलटण पीडिता महिला डॉक्टर प्रकरणी फलटण येथिल विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

           या कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांनी पीडित महिला डॉक्टर यांच्या विषयी आम्हाला संवेदना आहेत तिच्यावर अन्याय झाला तीन तिच्या मृत्यूच कारण आपल्या हातावर लिहून ठेवले होते परंतू विरोधकांनी याचेही राजकारण करत मुख्यमंत्री यांनी फलटणला येऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण केलं पण जनता आपल्या पाठीशी आहे त्यांना रणजितसिंह माहीत आहे अशी भावना व्यक्त केली.

           याच कार्यक्रमात फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील म्हणाले ज्या डॉक्टर युवतीने आत्महत्या केली तिच्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम पोलिसांनी दोन दिवसात केले आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे परंतू फलटण मधील काही लोकांकडून यामध्ये राजकारण सुरू आहे हे निंदनीय असून आम्ही सर्व त्या भगिणीच्या पाठीशी आहोत तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होईलच असे सांगितले.

फलटण येथील विविध विकास कामांच्या उदघाटन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी फलटण येथे झालेल्या निंदनीय घटनेबद्दल राजकीय नेत्यांनी परखड मते व्यक्त केली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ,पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार राहुल कुल, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, राम सातपुते, राजन परिचारक सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार