चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव:- 

तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव अनिल देशमुख यांचे आज दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. आज 21 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराचा नॉर्मल झटका आल्यावर त्यांना तुरंत शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासल्यावर पुढील त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात सांगितले. परंतु धुळे येथे नेत असतांना दुर्देवाने अचानक रस्त्यातच त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. धुळे येथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना लगेच शहरात वाऱ्यासारखी पसरली, अचानक घडलेल्या या घटनेने शहरात सर्वत्र शोक व्यक्त केले जात आहे. राजीव दादांनी 2009 ते 2014 या काळात चाळीसगाव तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरासह तालुक्यात अनेक विकास कामे झाली. त्यांच्या अचानक जाण्याने चाळीसगाव तालुक्यात राजकीय तथा सामाजिक पोकळी निर्माण झाल्याची जन भावना सर्वत्र व्यक्त होतांना दिसत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें