फलटण तालुक्याच्या हरितक्रांतीसाठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : रवींद्र बेडकीहाळ

फलटण तालुक्याच्या हरितक्रांतीसाठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : रवींद्र बेडकीहाळ

फलटण :

‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ फलटण तालुक्याच्या हरितक्रांतीच्या दिशेने वन विभागाने उचललेले महत्त्वाचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. वनक्षेत्रपाल निकिता बोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत हा उपक्रम केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता तालुक्यातील टेकड्या, किल्ले व मोकळ्या जागांवरही राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास संपूर्ण फलटण तालुका हिरवागार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते वडाचे रोप लावून झाला.

पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे फलटण येथे ‘अटल आनंद घन वन प्रकल्पाचा’ शुभारंभ उत्साहात झाला. वन विभागाच्या कार्यालयाशेजारील सुमारे १.५० हेक्टर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने तब्बल ४५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या माध्यमातून दाट घनवन विकसित केले जाणार आहे.

वनक्षेत्रपाल निकिता बोटकर यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, स्थानिक हवामानास पोषक विविध प्रजातींची लागवड करण्यात येणार असून, त्यामुळे हरितक्षेत्र वाढ, भूजल पातळी सुधारणा, तापमान नियंत्रण आणि जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मोठी मदत होईल.

यावेळी वनपाल नितीन जगदाळे, वनरक्षक आश्विनी लोखंडे, देवकी तहसीलदार, प्रियंका पालवे, प्रा. सुधीर इंगळे, अॅड. कांचन खरात, बापू बर्गे, सचिन जाधव , मंगेश कर्वे , राजेंद्र बोंद्रे, पोपट मिंड, अजय माळवे, योगेश गंगतिरे, गणेश भोईटे, सागर चव्हाण, प्रमोद सस्ते तसेच विविध सामाजिक संस्था�

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें