मराठा समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप; कारवाईच्या मागणीसाठी मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मराठा समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप; कारवाईच्या मागणीसाठी मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी :- 

सकल मराठा समाजातील महिलांबाबत सोशल मीडियावरील एका यूट्यूब चॅनलवरून आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, जालना येथील श्री. नवनाथ वाघमारे यांनी एका यूट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया देताना सकल मराठा समाजातील महिलांबाबत बदनामीकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडिया तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित वक्तव्यामुळे मराठा समाजातील माता-भगिनींचा जाहीर अवमान व बदनामी झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तसेच ओबीसी व मराठा समाजामध्ये गैरसमज, वैमनस्य व जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९६(१), २९९, ३५६, ३५३(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कारवाई न झाल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. निवेदनावर प्रशांत देविदास गायकवाड, गणेश धनाजी पवार, मनोज रमेशराव भोसले, तन्मय प्रकाशराव पवार, स्वप्निल भागवत गायकवाड यांच्यासह सकल मराठा समाजातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें