नवनाथ वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाचे निवेदन
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
Aस्वयंघोषित ओबीसी नेता नवनाथ वाघमारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा या साठी सकल मराठा समाजाचे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अलीकडेच नवनाथ वाघमारे याने एका युट्यूब चॅनलवर आपली मुलाखत देताना सकल मराठा समाजाच्या महिलांवर बदनामी कारक वक्तव्य केले होते. सदरचा व्हिडिओ आपल्याला पहाण्यासाठी पाठवला आहे. तरी याबाबत त्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. तरी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला देखील त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सकल मराठा समाज बांधव सुधीर पाटील, खुशाल बिडे, प्रदीप देशमुख, चंद्रकांत ठाकरे, अशोक भोसले, कैलास पाटील, नंदकिशोर पाटील, नामदेव तुपे, शशिकांत पाटील, प्रशांत पाटील, रमेश गोल्हार, रोहित बोरसे, सत्यजित पाटील, बंडू पगार, सुनील मराठे, कैलास पाटील, युवराज शिंदे, दर्शन पाटील, सागर नागणे, भानुदास सोनवणे, प्रतिभा पवार, अनिता शिंदे आदी मराठा बांधवांच्या सह्या आहे.












