गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपी पोलिसांच्या ताब्यात; चार गुन्ह्यांची उकल
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
शहरातील गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील दागिने आणि मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या एका सराईत महिला आरोपीस चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील चोरीचे एकूण चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. जालन्याची सराईत महिला ज्योती संतोष चव्हाण (रा. जि. जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव असून चाळीसगाव शहर हद्दीत गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करून त्यांच्या अंगावरील दागिने लांबवण्याच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय खबऱ्यांचे जाळे आणि उपलब्ध अभिलेखांच्या आधारे तपास चक्र फिरवत संशयित ज्योती चव्हाण हिला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती तिने गुन्ह्यांची कबुली दिली आहे. उकल झालेले गुन्हे आणि जप्त मुद्देमाल आरोपीच्या अटकेमुळे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे रजिस्टर क्रमांकः १७५/२०२६, ६९/२०२६, ६७/२०२६ आणि ३०९/२०२६ हे उघड झाले आहे. उघडकीस आलेल्या चार गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे, तर एका गुन्ह्यातील १०,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आआले आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, राहुल सोनवणे आणि नितीन आगोणे हे करत आहेत. या कारवाईत
प्रवीण जाधव, राहुल सोनवणे, नितीन आगोणे, योगेश बेलदार, किशोर पाटील, योगेश मांडोळे, दत्तू साळवे, विकास पाटील, कल्पेश पगारे, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, राकेश महाजन, प्रवीण पवार, महिला पोलीस अंमलदार विमल सानप, मालती बच्छाव, अनिता सुरवाडे, स्नेहल मांडोळे यांनी ही कारवाई केली.












