श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा 18 मे रोजी

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा 18 मे रोजी

फलटण | फलटण प्रतिनिधी

फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सभा सोमवार दि. 18 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मुख्य विषयावर होणार निर्णय

सभेमध्ये हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्याबरोबर दि. 01 मार्च 2022 रोजी करण्यात आलेला भागीदारी करार रद्द करण्याबाबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा व निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. 08 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार ‘Expression of Interest (EOI)’ प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी अथवा खाजगी तत्त्वावर चालविण्याबाबतही सभेमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

फक्त सभासदांनाच प्रवेश

कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कारखान्याचे सभासद असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेने सभेसाठी अधिकृत प्रतिनिधीचे नाव पंचकमिटीकडे लेखी स्वरूपात दि. 15 मे 2026 पर्यंत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही विशेष सर्वसाधारण सभा केवळ सभासदांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून सभासदांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सभास्थळी शिस्त व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून त्यासंदर्भातील पत्रही देण्यात आले आहे. विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

गणपूर्तीची विशेष सूचना

विशेष सूचनेनुसार, गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी सभा घेण्यात येणार असून त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें