राज्यातील 10 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नत्या, मोक्षदा पाटील मुंबईच्या अपर आयुक्तपदी  

राज्यातील 10 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नत्या, मोक्षदा पाटील मुंबईच्या अपर आयुक्तपदी  

मुंबई प्रतिनिधी :

राज्य गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील 10 वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२न नुसार हे आदेश काढण्यात आले असून, मुंबई, पुणे आणि अमरावतीसह विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.  

महत्त्वाच्या नियुक्त्या:  

मोक्षदा पाटील: SRPF मुंबई येथून बृहन्मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली.  

तेजस्वी सातपुते: SRPF पुणे समादेशक पदावरून पदोन्नतीने पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पदी नियुक्ती.  

प्रियांका नारनवरे: मुंबई वाहतूक अपर आयुक्त पदावरून MSRTC च्या मुख्य दक्षता अधिकारी, DIG पदी बदली.  

राकेश ओला: अमरावती पोलीस अधीक्षक पदावरून पदोन्नतीने अमरावतीचे पोलीस आयुक्त.  

अशोक दुधे: राज्य गुप्तवार्ता DCP पदावरून पदोन्नतीने SRPF मुंबई DIG पदी नियुक्ती.  

मुंबईत 3 DCP ना पदोन्नती  

बृहन्मुंबई पोलीस दलातील दीक्षित गेडाम, कृष्णकांत उपाध्याय आणि प्रविण मुंडे या तीन DCP ना पदोन्नती देऊन बृहन्मुंबईतच अपर पोलीस आयुक्त करण्यात आले.  

इतर नियुक्त्या  

गडचिरोलीचे प्रभारी DIG योगेश गुप्ता यांना त्याच पदावर पदोन्नती, तर पुणे CID चे SP एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांना CID DIG पदी पदोन्नती देण्यात आली.  

शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या आदेशात सर्व अधिकाऱ्यांना त्वरित पदभार स्वीकारण्याचे निर्देश आहेत. या फेरबदलांमुळे राज्य पोलीस दलाच्या वरिष्ठ स्तरात मोठे बदल झाले आहेत

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें