फलटणची नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांची जर्मनीतील ‘युथ ऍक्शन समिट २०२७’ साठी

फलटणची नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांची जर्मनीतील ‘युथ ऍक्शन समिट २०२७’ साठी निवड

फलटण : जर्मनी येथील बर्लिन शहरात ११ ते १४ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘युथ ऍक्शन समिट २०२७’ साठी फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांची युथ डेलिगेट म्हणून निवड झाली आहे. सेंटर फॉर डिप्लोमॅटिक ऍडव्हान्समेंट या संस्थेने शहा यांना या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अधिकृत निमंत्रण दिले आहे.

बर्लिन येथील हॉटेल एमओए येथे होणाऱ्या या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील १२५ हून अधिक देशांतील युवा नेते, व्यावसायिक, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. या परिषदेत युवा नेतृत्व, सार्वजनिक धोरण, हवामान बदल, शांतता प्रस्थापित करणे, डिजिटल प्रशासन आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर चर्चा केली जाणार आहे. या परिषदेमध्ये शहा या चर्चासत्रे, कार्यशाळा, संस्थात्मक भेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत, तसेच त्यांना या व्यासपीठावर बोलण्याची संधीही मिळणार आहे.

या वाटचालीत नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर सौ मनीषा समशेरसिंह नाईक निंबाळकरयांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal