आई – वडिलांची सेवा केली तर बाळूमामा भेटल्याशिवाय राहणार नाहीत : नवनाथ कोलवडकर 

आई – वडिलांची सेवा केली तर बाळूमामा भेटल्याशिवाय राहणार नाहीत : नवनाथ कोलवडकर 

दुधेबावी प्रतिनिधी :

सध्याच्या काळात मुलांना आई वडिलासाठी वेळ नसतो आणि देवदर्शनाला अगदी दुसऱ्या देशात जातात.किंवा बाळूमामाच्या दर्शना साठी आदमापूरला जातात.परंतू आई – वडिलांची सेवा केली तर बाळूमामा भेटल्याशिवाय राहणार नाहीत असे आवाहन ह. भ. प. नवनाथ महाराज कोलवडकर यांनी केले.

 

दुधेबावी. ता. फलटण येथे श्री संत बाळूमामा अमावस्या भंडारा उत्सवा निमित्त आयोजित कीर्तनात ह. भ. प. नवनाथ महाराज कोलवडकर बोलत होते.

 

कोलवडकर पुढे म्हणाले, श्री संत बाळूमामा हे जगाच्या पाठीवर असे संत आहेत की तुमची जर मेंढी माऊली वर सेवा असेल तर ते कोणत्याही रूपात तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत.तुमचं जर कर्म चांगले नसेल तर जगाचा बाप जरी आला तरी तो तुम्हाला वाचवू शकत नाही. तुम्ही जर बाळूमामाची मनापासून सेवा केली तर तुम्हाला बाळूमामा भेटल्याशिवाय राहणार नाहीत.

बाळूमामाच्या दरबारात काहीतरी मागण्यासाठी जाऊ नका तर त्यांनी जे तुम्हाला दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माणण्यासाठी जावा.

 

बाळूमामा हे जनसामान्यांचे लोकदैवत मानले जात असून त्यांनी समाजाला श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश दिला. ग्रामीण भागातील अनेक भक्त आजही त्यांच्या शिकवणीचे पालन करताना दिसून येतात. त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम भरवले जातात.तसेच दुधेबावी येथेही नेहमी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

 

यावेळी भाविकांनी “बाळूमामांचा जयघोष” करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. यावेळी सुरक्षा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें