साक्री प्रतिनिधी : (विलासराव पाटील)
धाडणे गावाचे भूमिपुत्र व रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.व उच्च माध्य.विद्यालय निगडोळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक शाखेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले व सध्या नामपूर येथे स्थायिक झालेले प्राचार्य कवी श्री.देवदत्त दौलतराव बोरसे यांचा त्यांच्या धाडणे या मुळगावी बुधवार दि.१८\११\२०२६ रोजी दिमाखदार सेवापूर्ती सत्कार समारंभ पार पडला.याप्रसंगी माजी जि.प.सदस्य मा.बापूसाहेब श्री.दिलीपराव काकुस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वप्रथम सत्कारमूर्ती कवी देवदत्त बोरसे व गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सिंधुताई निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे मा.अध्यक्ष व सत्कारमूर्तींच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते कवी देवदत्त बोरसे व सौ.भावना बोरसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष व खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य श्री देवदत्त लक्ष्मण बोरसे हे ऑक्टोबर 2026 मध्ये सेवानिवृत्त झाले. असे आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.बापूसाहेब दिलीपजी काकुस्ते यांनी सांगितले.देवदत्त बोरसे यांच्या शैक्षणिक जीवनपटावर दृष्टीक्षेप टाकतांना शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातून वाटचाल करतांना *”संघर्षाचे रणकंदन पार करून हर्षाचे नंदनवन*” निर्माण करणाऱ्या या भूमिपत्राचे मनापासून कौतुक केले.५८वर्ष गावात वास्तव्य नसूनही एवढा भव्यदिव्य सेवापूर्ती सत्कार पंचक्रोशीतील गावामार्फत झालेलं साक्री तालुक्यातील देवदत्त बोरसे हे एकमेव व्यक्तिमत्व आहे म्हणून बोरसे सर हे खूप भाग्यवंत आहेत असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जीवनगौरव, कार्यगौरव, काव्यगौरव, गुणवंत शिक्षक, जिजाऊ सन्मान पुरस्कार, ‘कोरोना योद्धा’ असे विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय काव्य व साहित्य संमेलनांमध्ये पुरस्कार व सन्मान मिळविलेले तसेच विविध क्षेत्रातील एकूण 108 पुरस्कार प्राप्त, 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अंमळनेर येथे व 98 व्या मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे निवड झालेले, कविवर्य वसंतराव आबाजी डहाके यांचे कडून त्यांच्या काव्य लेखनासाठी *’सुगंधानूज’* हे नाव प्राप्त असलेले श्री देवदत्त बोरसे यांनी *”काहीही नसताना दाखविलेला संयम व सर्व काही असताना दाखवलेली नम्रता”* या गुणांमुळेच धाडणे या त्यांच्या जन्मगावी ग्रामस्थांनी सत्कार आयोजित केला असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष श्री. दिलीप काकुस्ते यांनी केले. सत्कारमूर्ती कवी
देवदत्त बोरसे यांनी सत्काराला उत्तर देताना गावाने त्यांचा *न भूतो न भविष्यती* असा सपत्नीक सन्मान केल्याबद्दल शब्दसुमने व आनंदाश्रूंनी ऋण व्यक्त केले. काव्यात्मक शैलीत त्यांनी *”ज्याच्या हृदयात गाव असतं त्याचचं खऱ्या अर्थाने जगात नाव असतं”* या त्यांच्या सुभाषितासह त्यांनी कविताही सादर केली. भविष्यात धाडणे गावात अभ्यास केंद्र उभारल्यानंतर युवा पिढीच्या जीवनात वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचा व जीवनाला योग्य दिशा व रूपरेषा देण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचा संकल्प त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
*युवकांसाठी कार्य करण्याची ईच्छा* – यापुढे गावातील तरुणाईसाठी सर्वतोपरी काम करण्याची ईच्छा त्यांनी तरुणांना बोलून दाखवली. तुम्ही शून्यातून जग निर्माण करा. शून्यापुढचा एक व्हा तो एक जोडल्यानंतर तुमची किंमत दहा पट होते. गावात एमपीएससी यूपीएससी तसेच एनडीए असे अभ्यास केंद्र चालू करा त्यासाठी मला मिळणारं सामाजिक- सांस्कृतिक मानधन मी त्याग करेल आणि एमपीएससी यूपीएससी व एन. डी. ए. यांचे राज्यस्तरीय लेक्चर्स मी आपल्या गावात उपलब्ध करेल. तरुणांना चांगली दिशा मिळावी म्हणून मी सतत प्रयत्न करेल. आपल्या गावातील तरुण क्लास वन, क्लास टू झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे असे त्यांनी सांगितले.
घरातील वृद्धांना व आई-वडिलांना कचरा समजू नका तेच आपले खरे दैवत आहेत. आई-वडिलांची सेवा करा. असेही त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
*पत्नीचेही कौतुक* –
वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी माझे मातृछत्र हरपले आणि माझ्या वडिलांची सेवा संपूर्ण आयुष्यभर माझ्या सहचारिणी सौ. भावना यांनी केली.त्याचे फळ आम्हाला चांगले मिळाले तसेच तुम्हालाही मिळेल.
*गावासाठी संदेश* –
*माझा गांव समृद्ध गांव* या स्वप्नपूर्तीसाठी गावातील युवकांना त्यांनी आवाहन केले. गावात *संघटन पाहिजे पण विघटन नको*,*एकीचे बळ मिळते फळ* असा उपदेश तरुणांना देण्यास सुद्धा ते विसरले नाहीत.
दै देशोन्नती दै दिव्य मराठी दै. गावकरी दै.आपला महाराष्ट्र दै.लोकमत, गणतंत्र न्यूज, इंडिया दर्पण लक्ष महाराष्ट्र तसेच *’खानदेशनी वानगी’* *’कादवा शिवार** आणि *’गिरणाकाठ*’ या मासिकांमध्ये कविता व लिखाण करणारे तसेच समाज प्रबोधन करणारे, *देववाणी*, *गझल माझी बोलते* व *शब्दांच्या गाभाऱ्यातलं* हे काव्य प्रकाशनाच्या मार्गावर असलेलं हे महान व्यक्तिमत्व यांचा सत्कार करताना ग्रामस्थांनासुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.
या सर्वांगसुंदर सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे प्रितीभोजनासह आयोजन
मा.श्री.राजेंद्र भटू बोरसे,श्री.सुरेश गजमल बोरसे, श्री.शिरीष काशिनाथ बोरसे,श्री.भगवान रूपचंद ठाकरे व माजी सरपंच श्री.राजेंद्र पंडित बोरसे यांनी केले.
धाडणे गावातील शिवप्रतिष्ठान युवा मंच व विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामवासियांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.गावकऱ्यांनीही कवी देवदत्त बोरसे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार केला. याप्रसंगी पोलिस पाटील श्री.चतुर फकीरराव अहिरराव,श्री.निंबा चिंधु बोरसे,माजी सरपंच श्री. विठ्ठल शंकर बोरसे,श्रीमती सिंधुताई निकम, सुमनताई बोरसे, जेष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र अहिरराव व इतर जेष्ठ मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धाडणे गावातील शिवप्रतिष्ठान युवा मंच व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामवासियांनी बहुमोल सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.श्रीकांत शेवाळे सर यांनी केले तर श्री.सुरेश गजमल बोरसे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून समारोप केला.












