पंढरपूर ते घुमाणं संत नामदेव महाराज सायकल वारी शनिवारी फलटण मुक्कामी 

पंढरपूर ते घुमाणं संत नामदेव महाराज सायकल वारी शनिवारी फलटण मुक्कामी 

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 160 सायकल रायडर्सचा सहभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते होणार शुभारंभ

फलटण दि. 17 – संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाणं ( पंजाब ) या सुमारे 2500 किलोमीटर सायकल वारीचे उदघाटन राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार दि 21 नोव्हेंबर रोजी विश्रामगृह, श्री क्षेत्र पंढरपूर येथे करण्यात येणार असून ही वारी सायंकाळी फलटण मुक्कामी पोहोचणार आहे. या वारीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे 160 सायकल रायडर्सनी सहभाग घेतला असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमेटी श्री क्षेत्र घुमाणं ( पंजाब ), सायकल रायडर्स असोसिएशन व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने सन 2022 पासून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते. वारीचे हे पाचवे वर्ष आहे. 21 नोव्हेंबर रोजी निघणारी ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब या पाच राज्यांचा प्रवास करुन 13 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाणं येथे पोहोचणार आहे. सायकल वारीचा येथे समारोप करण्यात येणार आहे. पुढे हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या चार राज्यातून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन 21 डिसेंबर रोजी ही रथयात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या रथयात्रा व सायकल वारीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे 160 सायकल रायडर्स सहभागी झाले आहेत. हा या वर्षीच्या वारीचा उच्चाॅंक असून सायकल वारीत संत साहित्याचा प्रचार व प्रसार, आरोग्य, पर्यावरण, वृक्षारोपण, प्रदूषण, शिक्षण आदिविषयी प्रबोधन केले जात असल्याचेही भिसे म्हणाले. 

या पत्रकार परिषदेस पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष शंकर टेमघरे , उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ऍड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, सदस्य राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, राज्य समन्वयक गणेश उंडाळे, सायकल रायडर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र पिसे आदी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal