फलटण तालुक्यातील ढवळ पाटी येथे युवकाचा खून 

फलटण तालुक्यातील ढवळ पाटी येथे युवकाचा खून 

फलटण प्रतिनिधी 

फलटण प्रतिनिधी: तालुक्यातील ढवळ (ता. फलटण) गावाच्या हद्दीतील ढवळ पाटी येथे एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिरेवाडी येथील एका युवकाचा प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाला होता. या वादातून चार ते पाच जणांनी संबंधित युवकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मयत युवकाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें