उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 18 वर्षीय मुलीची छेडछाड

उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 18 वर्षीय मुलीची छेडछाड

फलटण प्रतिनिधी : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून उपजिल्हा रुग्णालयातच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी १८ मार्च २०२६ पासून आपल्या सहाध्यायी मुलींसोबत फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नर्सिंग इंटर्नशिप करत होती. ८ एप्रिल रोजी कामादरम्यान तिला अचानक त्रास जाणवू लागल्याने तिला त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

९ एप्रिल रोजी दुपारी तिची मैत्रीण घरी गेल्यानंतर ती वॉर्डमध्ये एकटी असताना, त्याच रुग्णालयात काम करणारा कर्मचारी अभिषेक अशोक सोडमिशे (रा. सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा) हा वॉर्डमध्ये आला. सुरुवातीला तब्येतीची विचारपूस केल्यानंतर त्याने तरुणीशी अयोग्य वर्तन करत तिच्या गळ्याला व शरीराला हात लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, “तू सिंगल आहेस, आनंदी राहा” अशा स्वरूपाची अश्लील वक्तव्येही केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ आपल्या आई व भावाला माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी अभिषेक अशोक सोडमिशे याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, आरोपी हा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असल्याने रुग्णालय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें