वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिरात दरा बाबत व्हॉईस ऑफ मीडिया’चे तहसीलदारांना निवेदन

वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिरात दरा बाबत व्हॉईस ऑफ मीडिया’चे तहसीलदारांना निवेदन

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या आणि पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले या निषेधार्थ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चाळीसगावच्या वतीने दि. 8 एप्रिल रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून जाहिरात दर प्रलंबित असलेली १५० टक्के दरवाढ तातडीने लागू करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कडक करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चाळीसगावचे तहसीलदार यांच्यामार्फत सदर निवेदन हे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ पासून कागद, शाई, बीज आणि मजुरीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र शासनाच्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे राज्यातील विशेषतः लघु आणि मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जाहिरात दरात १५० टक्के वाढ करावी, जाहिरात देयके ३० दिवसांच्या आत अदा करावीत आणि ई टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध देण्यात याव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले आणि त्यांच्यावर सूडबुद्धीने होणाऱ्या कारवायांबाबत संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवेदनावर व्हाईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष संतोष भोई, शहर उपाध्यक्ष रवींद्र कोष्टी, शहर संघटक रणधीर जाधव, शहर सल्लागार आनंद गांगुर्डे, सदस्य सोजीलाल हाडपे, रोहित शिंदे यांच्यासह स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें